मुंबई विजयाचा चौकार मारणार ?

आयपीएलमध्ये जवळपास आठवड्याभराच्या ब्रेकनंतर मुंबई पुन्हा मैदानात उतरत आहे.

Updated: May 8, 2016, 03:57 PM IST
मुंबई विजयाचा चौकार मारणार ? title=

विशाखापट्टणम: आयपीएलमध्ये जवळपास आठवड्याभराच्या ब्रेकनंतर मुंबई पुन्हा मैदानात उतरत आहे. मागच्या तिन्ही मॅचमध्ये जिंकलेला रोहितचा संघ या मॅचमध्ये विजयाचा चौकार मारण्यासाठी खेळेल. 

मुंबई इंडियन्सचा हा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विशाखापट्टणममध्ये होत आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून रोहित शर्मानं पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं आपल्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर हैदराबादला अपेक्षा असतील त्या कमबॅक करणाऱ्या युवराजकडून दुखापतीतून बाहेर आलेल्या युवराजनं आपल्या पहिल्या मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. 

या दोन्ही टीमच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर हैदराबाद 10 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर तर मुंबईही 10 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. 

पाहा लाईव्ह स्कोअर