नागपूर : पुरुष संघाप्रमाणेच न्यूझीलंडचा महिला संघही जबरदस्त कामगिरी करतोय. न्यूझीलंडच्या महिला संघाने आज ऑस्ट्रेलियान महिला संघाचा सहा गडी राखून पराभव केला.
ऑस्ट्रेलियाच्या १०४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड महिला संघाने हे लक्ष्य १६.२ षटकात पार केले. न्यूझीलंडकडून विकेटकिपर रिचेल प्रिस्ट हिने सर्वाधिक ३४ धावा केल्या. २७ चेंडूंच्या खेळीत तीने ५ चौकार आणि एक षटकार लगावला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या महिला गोलंदाजांनी ४ धावांत चार बळी घेत ऑस्ट्रेलियाला जबरदस्त धक्का दिलाय. त्यानंतर जरा पार्टरशीप झाली.त्यानंतर त्यांनी २० षटकात ८ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारली.
पहिले चार महत्त्वाचे फलंदाज चार धावांत गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून पेरी आणि ब्लॅकवेल यांनी खेळपट्टीवर जम बसवताना धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केलीये.
ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अॅलसा हेली दोन धावांवर परतली. त्यानंतर विलानी, ओस्बोर्न आणि लॅनिंग शून्यावर माघारी परतल्या.