सांगोल्याला पहिल्यांदा हिंदकेसरीचा मान, सुनील साळुंखेला मानाची गदा

४७ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे यानं चांदीची गदा जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुनील यानं कर्नाटकच्या जमखंडी इथल्या स्पर्धेत हरियाणाच्या हितेशकुमारला चितपट करीत हा बहुमान मिळविला आहे. 

Updated: Feb 2, 2015, 08:31 AM IST
सांगोल्याला पहिल्यांदा हिंदकेसरीचा मान, सुनील साळुंखेला मानाची गदा title=

जमखंडी: ४७ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे यानं चांदीची गदा जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुनील यानं कर्नाटकच्या जमखंडी इथल्या स्पर्धेत हरियाणाच्या हितेशकुमारला चितपट करीत हा बहुमान मिळविला आहे. 

विजयानंतर हिंदकेसरी पैलवान सुनील साळुंखे याची भव्य मिरणुकीद्वारे अडीच किलो वजनाची चांदीची गदा आणि रोख पाच लाख रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सुनीलच्या रूपानं सांगोला तालुक्यास हिंदकेसरी होण्याचा पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे.

जमखंडी इथं २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा अयोजित केली होती. या स्पर्धेसाठी भारतातील नामवंत कुस्तीपटू सहभागी झाले होते. चारदिवसीय चाललेल्या स्पर्धेत पैलवान सुनील साळुंखे यानं हरियाणाचा रामपाल भोलू, महाराष्ट्राचा विक्रम शिंदे, जम्मू काश्मीरचा सुरेंद्रसिंहला चितपट करून लढतीत अंतिम फेरी गाठली होती.

रविवारी हिंदकेसरी किताबासाठी पैलवान सुनील साळुंखे आणि हरियाणाचा पैलवान हितेशकुमार, पंजाबचा कृष्णकुमार, एअरफोर्समधून सतेंद्र यांच्यात लढत झाली. या लढतीत सुनीलनं हरियाणाच्या हितेशकुमारला पराभूत करून हिंदकेसरी ठरला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.