हेमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात बांग्लादेशच्या महमदुल्लाहनं शतक ठोकून रेकॉर्ड कायम केलाय. याबरोबरच त्यानं 'वर्ल्डकप २०१५'मध्ये रन्सच्या बाबतीत भारताच्या शिखर धवनलाही मागे टाकलंय.
वर्ल्डकप २०१५ मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये शिखर धवनला मागे टाकत महमदुल्लाह चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.
या यादीमध्ये श्रीलंकेचा कुमार संघकारा ४९६ धावांसह पहिल्या स्थानावर, दक्षिण आफ्रिकेचा डी व्हिलीयर्स ४१७ धावांसह दुसऱ्या स्थानावर, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान ३९५ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे... तर, बांग्लादेशचा महमदुल्लाह ३४४ धावांसह चौथ्या स्थानावर दाखल झालाय.... भारताचा शिखर धवन ३३३ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
याचबरोबर, आज महमदुल्लाहनं नाबाद १२८ रन्सची खेळी करत स्व:ताचाच रेकॉर्ड तोडलाय. वर्ल्डकप मधील हे त्याच सलग दुसरं शतक आहे, असं करणारा तो बांग्लादेशचा पहिलाच खेळाडू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.