माझी तुलना विराट कोहलीशी करू नका - उमर अकमल

भारताच्या विराट कोहलीशी माझी तुलना करणे चुकीचे आहे. कारण आम्ही दोघे वेगवेगळ्या स्थानावर फलंदाजी करतो, असे पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलने म्हटले आहे. 

Updated: Mar 13, 2015, 01:52 PM IST
माझी तुलना विराट कोहलीशी करू नका - उमर अकमल title=

अॅडिलेड : भारताच्या विराट कोहलीशी माझी तुलना करणे चुकीचे आहे. कारण आम्ही दोघे वेगवेगळ्या स्थानावर फलंदाजी करतो, असे पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलने म्हटले आहे. 

अकमलने अॅडिलेडमध्ये पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की, प्रत्येक वेळी टीमसाठी मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो. मला माहित आहे की लोक नेहमी माझी तुलना विराट कोहलीशी करतात. पण ते योग्य नाही. कारण तो वरच्या क्रमांकावर फलंदाजी करतो. 

माझी तुलना कोहलीशी करणे चुकीचे आहे, मी सहाव्या स्थानावर उतरून चांगला खेळतो, त्यामुळे तुलनेचा प्रश्नच नाही. मला फलंदाजीसाठी वरच्या स्थानावर पाठविले तर मी चांगली फलंदाजी करू शकेल. 

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर उतरण्याची इच्छा टीम मॅनेजमेंटकडे बोलून दाखविली का ?  या प्रश्नावर अकमल म्हटले की त्यांनी स्थानिक क्रिकेट पाहिले असते तर मी काही बोललो असतो. 

त्यांनी मला स्थानिक क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाहिले नाही. मला एवढेच बोलायचे की त्यांनी लवकरच माझ्यावर विश्वास टाकायला हवा. मला फलंदाजीसाठी वरच्या स्थानावर पाठवले पाहिजे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.