मुंबई : स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये काही प्रभावी खेळी खेळल्यानंतर विश्व चषकाच्या संभाव्य टीममध्ये सामील झालेल्या मनोज तिवारीने आपल्या खेळण्याच्या तंत्रात आणि अॅप्रोचमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच त्याला चांगला फॉर्म मिळाला आहे.
तिवारी याने लिस्ट ए च्या मागील पाच सामन्यात ५७, १३०, ५६, १५१ आणि ७५ धावा बनविल्या. त्याने पूर्व विभागाला देवधर चषक मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याला विश्व चषकाच्या संभाव्य ३० सदस्य संघात सामील करण्यात आले.
२९ वर्षीय फलंदाजाने सांगितले की, सत्राच्या सुरूवातीला लहानपणाचे कोच मानवेंद्र घोष सोबत नेट्समध्ये सराव केला. तसेच जलद आणि स्पीनरविरोधातही तंत्रावर काम केले.
जलद गोलंदाजांविरोधातील स्टान्स बदलला आणि उंच बॅकलिफ्ट ठेवली. यापूर्वी तो जरा खाली बॅकलिफ्ट ठेवत होता. त्यामुळे जलद गोलंदाजांना खेळायला कमी वेळ मिळायचा. आता तो प्रॉब्लेम होत नाही.
गेल्या सात वर्षात मनोजने नऊ वन डे आणि तीन टी -२० सामने खेळले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.