७० मिनिटांत फेल्प्सने जिंकली २ सुवर्णपदके

रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा गोल्डन प्रवास सुरु आहे. मंगळवारी फेल्प्सने आणखी दोन सुवर्णपदके आपल्या नावे केली. आतापर्यंत फेल्प्सच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदक त्याच्या नावावर आहेत. 

Updated: Aug 10, 2016, 03:43 PM IST
७० मिनिटांत फेल्प्सने जिंकली २ सुवर्णपदके title=

रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा गोल्डन प्रवास सुरु आहे. मंगळवारी फेल्प्सने आणखी दोन सुवर्णपदके आपल्या नावे केली. आतापर्यंत फेल्प्सच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदक त्याच्या नावावर आहेत. 

मंगळवारी त्याने बटरफ्लाय प्रकारात २०० मीटर अंतर त्याने एक १ मिनिट ५३.३६ सेकंदात पूर्ण केले. तसेच 4X100रिलेमध्येही त्याने सुवर्णपदकावर कब्जा केला. एकट्या फेल्प्सने १७३ देशांहून अधिक सुवर्णपदके जिंकलीत. मंगळवारी त्याने ७० मिनिटात दोन सुवर्णपदके मिळवण्याची किमया साधली. 

२०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक मिळवल्यानंतर त्याने लगेचच 4X100 रिलेमध्ये सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. अमेरिकेचा हा स्विमर ३१ वर्षांचा आहे. 

जर फेल्प्स नावाचा देश मानला गेला तर तर सुवर्णपदक जिंकणाऱ्याच्या यादीत तो ३३ व्या स्थानावर असेल.