बंगळुरू : भारतीय क्रिकेट महिला टीमची कॅप्टन मिताली राज एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० रन्स पूर्ण करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटर ठरलीय.
मितालीनं न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या एकदिवसीय मॅचमध्ये आपले नाबाद ८१ रन्स ठोकले. यादरम्यानं तिनं आपला हा रेकॉर्ड कायम केलाय. मितालीच्या अगोदर इंग्लंडच्या चालरेट एडवर्डस हिला महिला वनडेमध्ये ५००० रन्स पूर्ण करणं शक्य झालंय.
मितालीनं १४४ व्या खेळीत हा रेकॉर्ड कायम केलाय तर एडवर्डसनं हा टप्पा गाठण्यासाठी १५६ खेळी खेळल्या होत्या.
एडवर्डस हिच्या नावावर १८५ मॅचमध्ये ५८१२ रन्स नोंदले गेलेत. यामध्ये ९ शतक आणि ४५ अर्धशतक आहेत. तर तिची सरासरी आहे ३८.४९.
तर आयर्लंडविरुद्ध जून १९९९ पासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या ३२ वर्षीय मितालीनं आपल्या १६ वर्षांच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत १५७ मॅचमध्ये ४८.८२ च्या सरासरीनं ५०२९ रन्स केलेत. यामध्ये पाच शतक आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.
महिला एक दिवसीय क्रिकेटमध्ये सध्या तरी एडवर्ड आणि मितालीची बरोबरी कुणी करू शकणार नाही, असंच दिसतंय. कारण त्यांच्यानंतर बेलिंडा क्लार्क (४८४४) आणि कीरेन रोल्टन (४८१४) यांचा नंबर लागतो आणि या दोघींनीही आपली निवृत्ती याआधीच जाहीर केलीय.
सध्या खेळणाऱ्या खेळाडुंमध्ये इंग्लंडची सराह टेलर (३१४४) आणि वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर (३११५) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.