कर्णधार म्हणून धोनीची उद्या शेवटची मॅच

गेले एक दशक भारतीय संघाचे नेतृत्व करणारा महेंद्रसिंग धोनी उद्या मुंबईमध्ये इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारत ए टीमचे तो नेतृत्व करणार आहे. कर्णधार म्हणून धोनीची ही शेवटची मॅच आहे. 

Updated: Jan 9, 2017, 08:37 AM IST
कर्णधार म्हणून धोनीची उद्या शेवटची मॅच title=

मुंबई : गेले एक दशक भारतीय संघाचे नेतृत्व करणारा महेंद्रसिंग धोनी उद्या मुंबईमध्ये इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. भारत ए टीमचे तो नेतृत्व करणार आहे. कर्णधार म्हणून धोनीची ही शेवटची मॅच आहे. 

बुधवारी धोनीने एकाएकी वनडे आणि टी-20च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही सूत्रे विराट कोहलीकडे सोपवण्यात आलीये. उदया होणाऱ्या सराव सामन्यात धोनी नेतृत्व करतोय तर 12 जानेवारीला होणाऱ्या सामन्याचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. 

धोनीसह या मॅचमध्ये युवराज सिंगच्या कमबॅकवरही चाहत्यांचे लक्ष असेल. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने युवराजची या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित आहे. 

वेगवान गोलंदाज आशिष नेहरा सर्जरीनंतर संघात पुनरागमन करतोय. इंग्लंडमधील त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरु शकते. मात्र त्यासाठी पुढील पाच महिने चांगला फॉर्म तसेच फिटनेस कायम ठेवणे आवश्यक आहे. 

शिखर धवन फॉर्ममध्ये नसला तरी त्याला संघात स्थान देण्यात आलेय. त्यामुळे त्याची कामगिरी कशी होते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. धोनीने ऑक्टोबरमध्ये संपलेल्या न्यूझीलंड सीरिजनंतर धोनी खेळलेला नाहीये. त्यामुळे हा सराव सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा असेल. 

सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजता.