मुंबई इंडियन्सवाले जाम खूश

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगत असलेल्या वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लड सामन्यात इंग्लडचा विकेटकिपर जॉश बटलर मैदानावर आला तेव्हा मुंबईकरांनी त्याचे जोरदार स्वागत केले...

Updated: Mar 16, 2016, 09:06 PM IST
मुंबई इंडियन्सवाले जाम खूश  title=

मुंबई  : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगत असलेल्या वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लड सामन्यात इंग्लडचा विकेटकिपर जॉश बटलर मैदानावर आला तेव्हा मुंबईकरांनी त्याचे जोरदार स्वागत केले...

इंग्लडच्या या विकेटकीपरला मुंबई इंडियन्स आगामी सिझनसाठी आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे हा आपला खेळाडू आहे, असे समजून मुंबईकर आपल्या खास स्टाइलमध्ये बटलरला चिअर करत होते. 

बटलरने जेव्हा तीन षटकार मारले तेव्हा मुंबईकरांनी एखाद्या मुंबईकर प्लेअरने षटकार मारल्याचा आनंद व्यक्त केला.  जॉशने २० चेंडूत ३० धावा केल्या. 

पण एक जोरदार फटका मारण्याच्या नादात त्याने ब्राव्होच्या गोलंदाजीवर ब्राथविथकडे झेल दिला. त्यावेळी मुंबईकर खूप नाराज झाले. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x