यंदाच्या मोसमात मुंबईनं उघडलं खातं

कोलकता नाईटरायडयर्सविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे.

Updated: Apr 13, 2016, 11:52 PM IST
यंदाच्या मोसमात मुंबईनं उघडलं खातं title=

कोलकता: कोलकता नाईटरायडयर्सविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे. या विजयाबरोबरचं यंदाच्या मोसमामध्ये मुंबईनं आपलं खातं उघडलं आहे. 

कोलकत्याच्या इडन गार्डनवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून कोलकत्याला पहिले बॅटिंगला पाठवलं. कोलकत्यानं 20 ओव्हरमध्ये 187 रन केल्या. कॅप्टन गौतम गंभीरनं सर्वाधिक 64 तर मनिष पांडेनं 29 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली. 

188 रनचा पाठलाग करायला आलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. पार्थिव पटेल आणि रोहित शर्मानं 6 ओव्हरमध्ये 53 रनची पार्टनरशिप केली. मुंबईच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो रोहित शर्मा. रोहितनं 54 बॉलमध्ये 84 रन केल्या. तर जॉस बटलरनं 22 बॉलमध्ये 41 रन करून रोहितला चांगली साथ दिली. 

या विजयामुळे आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पाचव्या क्रमांकावर आली आहे. एकूण 2 सामन्यांपैकी मुंबईनं एक सामना जिंकला आहे. मुंबईकडे आता 2 पॉईंट्स आहेत.