रोहितच्या हाफ सेंच्युरीमुळे मुंबईचा विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माच्या हाफ सेंच्युरीमुळे मुंबईनं हा सामना जिंकला. 

Updated: May 1, 2017, 07:54 PM IST
रोहितच्या हाफ सेंच्युरीमुळे मुंबईचा विजय title=

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माच्या हाफ सेंच्युरीमुळे मुंबईनं हा सामना जिंकला. 163 रन्सचं आव्हान मुंबईनं 19.5 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पूर्ण केलं. रोहित शर्मानं 37 बॉल्समध्ये 56 रन्स केल्या. रोहितच्या या इनिंगमध्ये एक सिक्स आणि सहा फोरचा समावेश होता. रोहितबरोबरच जॉस बटलरनं 21 बॉल्समध्ये 33 रन्स केल्या.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 162 रन्स केल्या. एबी डिव्हिलियर्सनं 27 बॉल्समध्ये सर्वाधिक 43 रन्स केल्या. मुंबईच्या मिचेल मॅकलेनघननं 3 तर कृणाल पांड्यानं आरसीबीच्या दोन विकेट घेतल्या. कर्ण शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळालं.

आरसीबीविरुद्धच्या या विजयामुळे मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. 10 मॅचमध्ये 8 मॅच जिंकल्यामुळे मुंबईकडे आता 16 पॉईंट्स आहेत.