सलग पाच मालिकेत विजय मिळवणारा कोहली बनला पहिला कर्णधार

मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारत मालिकेत 3-0ने विजयी आघाडी घेतलीये. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला एक डाव आणि 36 धावांनी हरवले. 

Updated: Dec 12, 2016, 10:40 AM IST
सलग पाच मालिकेत विजय मिळवणारा कोहली बनला पहिला कर्णधार title=

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारत मालिकेत 3-0ने विजयी आघाडी घेतलीये. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला एक डाव आणि 36 धावांनी हरवले. 

84 वर्षांत पहिल्यांदाच सलग पाच मालिका जिंकण्याचा विक्रम भारताने केलाय. यासोबतच इतक्या मालिका सलग जिंकणारा विराट पहिला कर्णधार ठरलाय. 

याआधी रविवारी विराटने इंग्लंडविरुद्ध वर्षातील तिसरे द्विशतक 
झळकावले होते. यासोबतच 139 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात एका वर्षात तीन द्विशतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. 

या विजयासह इंग्लंडविरुद्ध तब्बल 8 वर्षानंतर भारताने मालिका जिंकलीये. 2008मध्ये भारताने इंग्लंडला 1-0ने हरवले होते.