निवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी

मी अजून ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे अजून तरी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार नाही. टी-२० वर्ल्ड कपनंतर विचार करेल असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्पष्ट केले आहे. 

Updated: Mar 26, 2015, 05:36 PM IST
निवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी  title=

सिडनी : मी अजून ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे अजून तरी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार नाही. टी-२० वर्ल्ड कपनंतर विचार करेल असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्पष्ट केले आहे. 

ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये भारताला ९५ धावांनी नमविले. त्यानंतर झालेल्या प्रझेंटेशनमध्ये कॉमेंट्रेटर मार्क निकलस याने धोनीला प्रश्न विचारला. हा धोनीचा लास्ट वर्ल्ड कप आहे का. त्यावर धोनी म्हणाला, मी अजून ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे अजून तरी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार नाही. टी-२० वर्ल्ड कपनंतर विचार करून शकतो. २०१९ ला अजून खूप वेळ आहे. 

धोनीने पराभवाचे खापर जलद गोलंदाजांवर फोडले. तो म्हणाला, जलद गोलंदाजांची गोलंदाजी चालली नाही. तसेच तळाच्या फलंदाजांना अशा परिस्थिती बॅटिंगही करणे गरजेचे आहे. नॉक आऊटमध्ये तुम्हांला आपला खेळ उंचावावा लागतो पण तसे झाले नाही. खेळामध्ये कोणताही एक संघ जिंकतो. यावेळेस ऑस्ट्रेलियाने चांगला खेळ केला. निकाल त्यांच्या बाजूने लागला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.