ऑनलाइन तिकिट बुकींग करणाऱ्यांसाठी ही बातमी जरुरीची

धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकिट बुकींग करणाऱ्या प्रेक्षकांना आपले तिकीट काऊंटरवरुन घ्यावे लागणार आहे. याच बुकींगच्या स्लिपच्या आधारे स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार आहे.

PTI | Updated: Sep 30, 2015, 06:18 PM IST
ऑनलाइन तिकिट बुकींग करणाऱ्यांसाठी ही बातमी जरुरीची title=
धर्मशाला क्रिकेट स्टेडिअम, छाया - पीटीआय

मुंबई : धर्मशाळा येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकिट बुकींग करणाऱ्या प्रेक्षकांना आपले तिकीट काऊंटरवरुन घ्यावे लागणार आहे. याच बुकींगच्या स्लिपच्या आधारे स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. काऊंटरवर तिकीट घेतल्यानंतर स्टेडिअममध्ये जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तुम्ही तिकीट घेतले नाही तर क्रिकेट सामना पाहायला मिळणार नाही. ऑनलाईन तिकीट काऊंटरवर देण्यासाठी पोलीस विभागातने निर्देश जारी केलेत.

तिकीट मिळण्यासाठी प्रेक्षकांना काऊंटरवर स्लिप आणि ओळखपत्र दाखवावे लागेल. पहिला सामना धर्मशाळा येथे २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. आधीच दक्षिण आफ्रिकेचा संघ येथे पोहोचला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.