'अजुनही आम्हाला कळतं नाहीय, आमचा पराभव का होतो?'

टीम इंडियाने पाकिस्तानचा आज दारूण पराभव केला, पण पाकिस्तान टीमला आजही कळत नाहीय की, टीम इंडियाला नेमकं कसं हरवायचं.

Updated: Feb 15, 2015, 11:02 PM IST
'अजुनही आम्हाला कळतं नाहीय, आमचा पराभव का होतो?' title=

अॅडलेड : टीम इंडियाने पाकिस्तानचा आज दारूण पराभव केला, पण पाकिस्तान टीमला आजही कळत नाहीय की, टीम इंडियाला नेमकं कसं हरवायचं.

पाकिस्तानला १९९२ मध्ये टीम इंडियाने हरवलं होतं. तेव्हापासून सुरू झालेला वर्ल्डकपमधीस विजयाचा हा सिलसिला, २६ वर्षांपासून कायम आहे.

धोनीच्या टीमने आज ७६ धावांनी पाकिस्तान टीमला लोळवलं.

पराभवावर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह म्हणतो,
मिसबाह म्हणतो, मला नाही माहित, हे का होतंय, मी याबाबतीत काहीच करू शकत नाही, मला एवढंच म्हणायचंय ते चांगले खेळतात, आज संपूर्ण सामन्यात ते खिलाडू वृत्तीने खेळले, त्यांनी बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली, मॅच संपलीय आता आम्हाला पुढील सामन्यांवर लक्ष्य केंद्रीत करावं लागेल. कदाचित भारताचा सामना करतांना आमची टीम दबावात आली असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.