विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार

विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार करण्यात आलाय. दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांनी कौतुक गौरव केला. प्रणव धनावडे यावेळी क्रिकेट बॅट आणि साहित्य प्रणवला भेट दिले. 

Updated: Jan 6, 2016, 12:40 PM IST
विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार title=

कल्याण : विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार करण्यात आलाय. दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांनी कौतुक गौरव केला. प्रणव धनावडे यावेळी क्रिकेट बॅट आणि साहित्य प्रणवला भेट दिले. 

भविष्यात असाच खेळत राहा, सातत्य ठेव असा सल्ला या माजी कसोटीपटूंनी प्रणवला दिला. सकाळी माटुंग्यातल्या जिमखान्यात प्रणवचा सत्कार करण्यात आला... विश्वविक्रमी १००० धावा केल्यानंतर सर्व स्तरातून प्रणवचं कौतुक होतंय. सरकारनं त्याच्या शिक्षणाचा खर्च उचललाय तर कल्याण-डोंबिवली पालिकेकडून त्याचा जंगी सत्कार करण्यात येणाराय

जगभरातून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेटविश्वात 1000 धावा बनवण्याचा भीमपराक्रम करणा-या कल्याणच्या प्रणव धनावडेवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. एरव्ही काही अपवाद वगळता भारतातल्या घटनांची दखल घेणा-या आंतरराष्ट्रीय मिडीयानंही प्रणवला ठळक प्रसिद्धी देऊन त्याच्या विश्वविक्रमावर कौतुकाची थाप दिलीय. फक्त क्रिकेटविश्वाशी संबंधित वेबसाईट किंवा वृत्तपत्रांशिवाय जागतिक राजकारणावर महत्त्वाची मानल्या जाणा-या वृत्तपत्रानंही प्रणवच्या विक्रमाची दखल घेतलीय.