सानिया मिर्झासोबत ऑलिम्पिकमध्ये प्रार्थना ठोंबरे

रिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर प्रार्थना ठोंबरे ही मराठमोळी खेळाडू खेळणार आहे.

Updated: Jun 11, 2016, 05:07 PM IST
सानिया मिर्झासोबत ऑलिम्पिकमध्ये प्रार्थना ठोंबरे title=

मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर प्रार्थना ठोंबरे ही मराठमोळी खेळाडू खेळणार आहे. प्रार्थना ही सोलापूरच्या बार्शीमधली आहे. सानिया आणि प्रार्थना रिओमध्ये टेनिसच्या महिला दुहेरीत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. 

सानिया मिर्झानंच आपली जोडीदार म्हणून प्रार्थनाची निवड केली आहे. याआधी सानिया आणि प्रार्थनानं एशियाडमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं होतं. मागचं एक वर्ष प्रार्थना सानिया मिर्झा अकॅडमीमध्ये तयारी करत आहे. 

जागतिक महिला दुहेरीच्या रँकिंगमध्ये सानिया पहिल्या क्रमांकावर आहे, तर प्रार्थना 209व्या क्रमांकावर आहे. भारतीय टेनिस रँकिंगमध्ये मात्र प्रार्थना दुसऱ्या क्रमांकावर आहे.