आर. अश्विन आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल

२०१५ या वर्षात भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने जबरदस्त कामगिरी केलीय. मात्र गेल्या ४२ वर्षांत इतर भारतीय गोलंदाजांना जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलंय.

Updated: Dec 31, 2015, 01:56 PM IST
आर. अश्विन आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल title=

नवी दिल्ली : २०१५ या वर्षात भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने जबरदस्त कामगिरी केलीय. मात्र गेल्या ४२ वर्षांत इतर भारतीय गोलंदाजांना जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलंय.

आर. अश्विनने वर्षाच्या शेवटच्या दिवशी आयसीसीच्या रँकिगमध्ये तब्बल अव्वल स्थान मिळवलेय. त्याने अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनलाही मागे टाकलंय, 

३१ डिसेंबरपूर्वी अश्विन या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी होता. या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा अश्विन १९७३ नंतर पहिलाच गोलंदाज ठरलाय. याआधी १९७३ मध्ये बिशन सिंग बेदी यांनी या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या अश्विन या वर्षात जबरदस्त कामगिरी केलीय. या वर्षात अश्विनने ६२ विकेट मिळवत चांगले प्रदर्शन केले.