close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मायलेकीच्या भेटीसाठी 'त्या'ने खेळ थांबवला

टेनिसजगतातील प्रसिद्ध खेळाडू राफेल नदाल याचा एक व्हिडीओ सध्या यूट्यूबवर चांगलाच व्हायरल होतोय. 

Updated: Sep 30, 2016, 08:40 AM IST
मायलेकीच्या भेटीसाठी 'त्या'ने खेळ थांबवला

मुंबई : टेनिसजगतातील प्रसिद्ध खेळाडू राफेल नदाल याचा एक व्हिडीओ सध्या यूट्यूबवर चांगलाच व्हायरल होतोय. 

सामन्यादरम्यान हरवलेल्या मुलीची तिच्या आईशी भेट घडवून देण्यासाठी राफेलने सामना काही वेळासाठी थांबवला. आई-मुलीच्या भेटीचा तो क्षण पाहून राफेलच्या डोळ्यातही अश्रू तरळले.

राफेलच्या खेळ पाहण्यासाठी टेनिसकोर्टवर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान खेळ पाहायला आलेल्या एक महिलेची लहानगी मुलही गर्दीत हरवली. मुलगी हरवल्याचे लक्षात येताच त्या आईची मुलीला शोधण्यासाठी धडपड सुरु झाली. मुलीला शोधण्यासाठी ती जोरजोरात हाका मारु लागली. मात्र चाहत्यांच्या गोंगाटात तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचत नव्हता. यावेळी राफेलचे तिच्याकडे लक्ष गेले. 

त्याने तात्काळ खेळ थांबवला आणि मुलीचा शोध सुरु झाला. काही वेळात गर्दीत रडत असलेल्या मुलीला महिलेने पाहिले आणि तिने जाऊन घट्ट मिठी मारली. माय-लेकीच्या या भेटीचे दृश्य पाहून राफेलचेही डोळे पाणावले.