close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ : एका आईचा रडवेला चेहरा नदालला पाहवेना, म्हणून...

टेनिस कोर्टाचा बादशाह राफेल नदाल त्याच्या खेळाप्रती असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातोच... शिवाय तो त्याच्या संवेदनशीलतेसाठीही ओळखला जातो. 

Updated: Sep 29, 2016, 10:34 PM IST
व्हिडिओ : एका आईचा रडवेला चेहरा नदालला पाहवेना, म्हणून...

नवी दिल्ली : टेनिस कोर्टाचा बादशाह राफेल नदाल त्याच्या खेळाप्रती असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातोच... शिवाय तो त्याच्या संवेदनशीलतेसाठीही ओळखला जातो. 

असाच एक प्रसंग मैदानावर पाहायला मिळाला... मैदानावर आपल्या हरवलेल्या चिमुरडीला शोधताना एक आई रडवेली झाली... आपल्या चिमुरडीचं नाव घेऊन आई तिला पुकारू लागली... तिच्याकडे कॅमेरा वळला... आणि नदालनंही रंगलेला खेळ थांबवला.

काही क्षणांतच ही चिमुरडी मैदानावरच सापडली... आणि नदालच्याही चेहऱ्यावर पसरलेलं हास्य कॅमेऱ्यावर दिसलं... काही क्षणाचा हा प्रसंग पण नदालच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याचा संवेदनशीलतेचा दाखला देऊन गेला.