प्रत्येक पाकिस्तानी शहीद व्हायला तयार, मियादाद बरळला

 शाहीद आफ्रिदीनंतर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियादाद भारताबद्दल बरळला आहे.

Updated: Oct 3, 2016, 05:16 PM IST
प्रत्येक पाकिस्तानी शहीद व्हायला तयार, मियादाद बरळला title=

इस्लामाबाद : शाहीद आफ्रिदीनंतर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियादाद भारताबद्दल बरळला आहे. भारतानं आम्हाला पोकळ धमक्या देऊ नये, पाकिस्तानला प्रत्येक जण शहीद व्हायला तयार आहे, अशी दर्पोक्ती जावेद मियादादनं केली आहे.

पाकिस्तानी चॅनल समा टीव्हीवर मियादादनं हे विष ओकलं आहे. यावेळी मियादादनं नरेंद्र मोदींवरही खालच्या शब्दांमध्ये टीका केली आहे. याआधी शाहीद आफ्रिदीनं भारताला धमकी दिली होती.  भारतीयांना हे नाही माहीत की पाकिस्तानी लष्कराच्या पुढे पठाण उभे असतात. सर्व सीमांचे रक्षण पठाण करतात, असं आफ्रिदी म्हणाला होता.

पाहा काय बरळला जावेद मियादाद