नवी दिल्ली : भारतात सुरु झालेल्या वर्ल्डकपदरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉम ६ स्टेडियम्समध्ये मोफत वायफाय उपलब्ध कऱणार आहे. रिलायन्सने सोमवारी याबाबतची घोषणा केली.
रिलायन्सने याबाबतचे परिपत्रक काढताना भारतातल्या सहा स्टेडियमवर ही सुविधा देणार असल्याचे सांगितले. वायफायची सुविधा क्रिकेट चाहत्यांना योग्य प्रकारे उपलब्ध व्हावी यासाठी जिओ पूर्णपणे प्रयत्नशील आहे.
या स्टेडियम्समध्ये बंगळूरुतील एम.चिन्नास्वामी स्टेडियम, धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ, कोलाकातामधील ईडन गार्डन, मोहालीतील पंजाब क्रिकेट संघ स्टेडियम, दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियम आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा समावेश आहे.