पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने दीडशतक साकारताना अनेक रेकॉर्डही मोडले. ऑस्ट्रेलियाच्या पर्थवर वनडेत शतक लगावणारा पहिला क्रिकेटर ठरलाय. त्याने १६३ चेंडूत १७१ धावा ठोकल्या.
या शतकासोबतच ऑस्ट्रेलियन भूमीवर शतक ठोकणारा तो सहावा भारतीय ठरलाय. यापूर्वी सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांनी हा विक्रम केला होता.
२००८ मध्ये गंभीरने ऑस्ट्रेलियन भूमीवर शेवटचे शतक ठोकले होते त्यानंतर तब्बल आठ वर्षानंतर रोहितने हा विक्रम केला. या शतकासह रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. तसेच ऑस्ट्रेलियात तीन शतके ठोकणाता तो दुसरा गोलंदाज ठरलाय. यापूर्वी व्ही.व्ही.एस लक्ष्मणने ऑस्ट्रेलियात तीन शतके ठोकली होती.