रोहितनं वाचवलं, दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

Updated: Oct 2, 2016, 05:39 PM IST
रोहितनं वाचवलं, दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत title=

कोलकाता : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं 8 विकेटच्या मोबदल्यात 227 रन केल्या आहेत. भारताकडे आता एकूण 339 रनची आघाडी आहे.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात 127 रनवर आठ विकेट अशी करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव 204 रनवर आटोपला, यामुळे भारताला 112 रनची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आलेल्या भारतीय बॅट्समनची पडझड झाली. 43 रनवर भारताच्या चार विकेट गेल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताला सावरलं.

रोहित शर्मानं 132 बॉलमध्ये 82 रनची खेळी केली तर विराट कोहली 65 बॉलमध्ये 45 रनकरून आऊट झाला. दिवसाच्या शेवटी वृद्धीमान सहा 39 रनवर तर भुवनेश्वर कुमार 8 रनवर खेळत आहे.