रो'हिट' शर्मानं वर्ल्डकपमध्ये पहिली, वनडेतील 7वी सेंच्युरी

2015 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत शांत राहिलेली रोहित शर्माची बॅट आज क्वॉर्टर फायनलमध्ये बांग्लादेशविरुद्ध बरसली. रोहितनं वर्ल्डकपमधील पहिली आणि वनडे करिअरमधील 7 वी सेंच्युरी आज ठोकली.

Updated: Mar 19, 2015, 06:08 PM IST
रो'हिट' शर्मानं वर्ल्डकपमध्ये पहिली, वनडेतील 7वी सेंच्युरी title=

मेलबर्न: 2015 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत शांत राहिलेली रोहित शर्माची बॅट आज क्वॉर्टर फायनलमध्ये बांग्लादेशविरुद्ध बरसली. रोहितनं वर्ल्डकपमधील पहिली आणि वनडे करिअरमधील 7 वी सेंच्युरी आज ठोकली.

रोहितनं 126 बॉल्समध्ये 137 रन्सची दमदार खेळी केली. मेलबर्न स्टेडियमवरील रोहितची ही दुसरी सेंच्युरी आहे. वनडेमध्ये 134वी मॅच खेळणाऱ्या रोहितनं वर्ल्डकपमध्ये सेंच्युरी करणारा भारताचा 13वा आणि जगातील 102वा बॅट्समन आहे. 

वनडेमधील 7व्या सेंच्युरीसोबतच रोहितनं अजय जडेजा, व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि नवज्योत सिंह सिद्धूचा रेकॉर्ड मोडत मोहम्मद अझहरुद्दीनची बरोबरी केलीय. 

आतापर्यंत सचिन तेंडुलकर (49), विराट कोहली (22), सौरव गांगुली (22), विरेंद्र सेहवाग (15), युवराज सिंह (13), राहुल द्रविड (12), गौतम गंभीर (11), महेंद्र सिंह धोनी (8) आणि शिखर धवन (8) रोहितच्या सध्या पुढे आहे.

आजच्या खेळासोबतच रोहित मेलबर्नमध्ये सर्वाधिक रन (335) बनवणारा भारतीय क्रिकेटपटू बनलाय. त्यानं सौरव गांगुलीला (210) मागे टाकलं. रोहितनं सात सेंच्युरींपैकी तीन ऑस्ट्रेलियाविरुद्ध, दोन श्रीलंकेविरूद्ध आणि 1 झिम्बाव्वे आणि 1 बांग्लादेशविरुद्ध केल्या आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक रन्स (264) बनविण्याचा रेकॉर्डही रोहितच्याच नावे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.