VIDEO : गंभीर धोनीशी असा का वागला?

दिल्ली आणि झारखंड यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानावर असा प्रकार घडला ज्याने सर्वांनाच हैराण करुन टाकले.

Updated: Dec 27, 2015, 03:49 PM IST
VIDEO : गंभीर धोनीशी असा का वागला? title=

नवी दिल्ली : दिल्ली आणि झारखंड यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानावर असा प्रकार घडला ज्याने सर्वांनाच हैराण करुन टाकले. सामन्यादरम्यान झारखंडची अखेरची विकेट पडल्यानंतर दिल्लीने सामन्यात विजय मिळवला. सामना संपल्यानंतर धोनी दिल्लीच्या क्रिकेटरशी हात मिळवत होता. 

यावेळी गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी आमनेसामने आले. मात्र गंभीर पाहूनही न पाहिल्यासारखे केले आणि हात न मिळवताच तो पुढे निघून गेला. गंभीरच्या वागण्याने अनभिज्ञ असलेल्या धोनीने मागे वळून पाहिलेही मात्र गंभीरने धोनीला न पाहिल्यासारखे केले आणि तो पु़ढे चालत राहिला. 

गंभीरचे हे वागणे पाहून केवळ धोनीच हैराण झाला नाही तर सर्व क्रिकेटर त्याच्याकडे पाहत राहिले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या इशांत शर्मालाही काय झाले ते नेमके कळले नाही. या घटनेनंतर तोही सैरभैर होऊन काही काळ दोघांकडे पाहत राहिला.