सचिनने धोनी, युवराज, कोहलीकडून मागितलंय हे गिफ्ट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट बघणे काही बंद केलेले नाही. तेंडुलकरने टीम इंडियाचे तीन दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्याकडून खास गिफ्ट मागितलंय.

Updated: Jan 31, 2016, 09:52 AM IST
सचिनने धोनी, युवराज, कोहलीकडून मागितलंय हे गिफ्ट title=

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट बघणे काही बंद केलेले नाही. तेंडुलकरने टीम इंडियाचे तीन दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्याकडून खास गिफ्ट मागितलंय.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामनाही जिंकून भारताने ऑस्ट्रेलियावर निर्भेळ यश मिळवावे अशी इच्छा व्यक्त केलीये. भारताने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी टी-२० ३७ धावांनी जिंकत मालिका विजय मिळवला. यानंतर तिसरीही टी-२० भारताने जिंकून निर्भेळ यश मिळवावे. धोनी, कोहली आणि युवी हे करुन दाखवा, असे तेंडुलकरने ट्विटरद्वारे म्हटलेय. 

भारत सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. रविवारी तिसरा आणि शेवटचा सामना होतोय. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून वनडे मालिका पराभवाचा बदला घेण्याचा भारत पुरेपूर प्रयत्न करेल.