मुंबई : क्रिकेटसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं भरधाव वेग आणि वेगवान गाड्यांबद्दल असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र त्याची हीच आवड एकदा त्याच्यासाठी आणि पत्नी अंजलीसाठी डोकेदुखी ठरली.
दिवसभर त्यांना या त्रासातून जावं लागलं होतं, असा किस्सा सचिननं एका कार्यक्रमात सांगितला. इंग्लंडमध्ये बीएमडबल्यूच्या अधिकाऱ्यांनी सचिनला एक नवी कोरी गाडी टेस्ट ड्राइव्हसाठी दिली होती. ही गाडी चालवून यातील ब्रेक चेक करावे, तसेच अभिप्राय कळवावा असं कंपनीनं सचिनला सांगितलं होतं. त्यानंतर सचिन या टेस्ट ड्राईव्हसाठी अंजलीला सोबत घेऊन गेला.
सचिननं सुसाट वेगात गाडी चालवली. त्याचवेळी त्यानं ब्रेकही चेक केले. त्याला कंट्रोल केलं. मात्र यानंतर सचिन आणि अंजलीला असा काही धक्का बसला की दोघांनाही दिवसभर डोकेदुखीचा त्रास झाल्याचं सचिननं सांगितलं. यावेळी सचिन आपल्या वेगवान गाड्यांविषयीचे प्रेम आणि फार्म्युला वन कार रेसिंगच्या आवडीविषयीही भरभरुन बोलला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.