मुंबई : मास्टर ब्लास्टर आणि भारत रत्न सचिन तेंडुलकर याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत सचिननेच माहिती दिली आहे.
सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दुखापतीने डोकेवर काढले होते. त्याच्या पायावरील एका गुडघ्यावर ऑपरेशन करण्यात आले आहे. सचिनच्या गुडघ्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. सचिनने शस्त्रक्रियेनंतरचा गुडघ्याचा फोटो फेसबुकवर शेअर केलाय.
काही दुखापती निवृत्तीनंतरही छळत राहतात. मला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी मी लवकरच पुनरागमन करेन, गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असून मी सध्या आराम करतोय, अशी माहिती सचिनने दिली. फेसबुक पोस्टवर फोटो शेअर केल्यानंतर सचिन प्रेमींनी काळजी व्यक्त केली आहे.