विराट-अनुष्कामध्ये सलमाननं केलं पॅचअप ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं सुत पुन्हा जुळल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Updated: Apr 7, 2016, 05:25 PM IST
विराट-अनुष्कामध्ये सलमाननं केलं पॅचअप ? title=

मुंबई: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं सुत पुन्हा जुळल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकतच या दोघांना बांद्र्याच्या रॉयल्टी क्लबमध्ये पाहण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या क्लबमधून बाहेर पडतानाचे दोघांचे फोटोही व्हायरल झाले. 

या दोघांमध्ये मध्यस्ती सलमान खाननं केल्याच्या चर्चा आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीनं उत्कृष्ट कामगिरी केली. यावेळी सोशल नेटवर्किंगवर विराट आणि अनुष्काबाबतच्या जोक्सचा पूर आला. यामुळे विराट कोहली चांगलाच भडकला आणि त्यानं अनुष्काची बाजू घेतली होती. 

विराटच्या या भूमिकेमुळे हे दोघं पुन्हा जवळ येत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आणि आता या दोघांना एकत्र आणण्यासाठी सलमानकडून प्रयत्न होत असल्याचं बोललं जात आहे.