मुंबई : आपल्या होणाऱ्या पत्नीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात अडकलेल्या भारतीय हॉकी संघाचा कप्तान असणाऱ्या सरदार सिंगने आता या प्रकरणावर भाष्य केले आहे. एक पत्रकार परिषद घेऊन त्याने आपली बाजू मांडली आहे.
सरदारच्या म्हणण्यानुसार त्यांची फेसबूकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. पण, त्यांचे लग्न ठरले नव्हते. रिपोर्ट आल्यावर माझे मत मांडेन. पण, ही पीडित मुलगी खोटे बोलत आहे असे तो म्हणाला.
ब्रिटीश नागरिक असलेल्या या महिलेने सरदारविरुद्ध लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप केला होता. या २१ वर्षीय महिलेने केलेल्या दाव्यानुसार तिची आणि सरदारची २०१२ साली लंडन ऑलिम्पिक दरम्यान भेट झाली होती. तेव्हापासून त्यांचे संबंध राहिले आहेत.
सरदारने तिला लग्नाचे आश्वासनही दिले होते ज्यामुळे दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यानंतर गेल्या वर्षी महिलेचा जबरदस्तीने गर्भपातही केला होता, असंही तिनं आपल्या तक्रारीत म्हटलंय. याच कारणास्तव तिने लुधियानातील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.