टॅक्स चोरी प्रकरणात सानिया मिर्झाला नोटीस

 टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या अडचणी वाढू शकतात. सर्विस टॅक्स डिपार्टमेंटने टॅक्स चोरीच्या प्रकरणात सानियाला समन्स पाठवला आहे.

Updated: Feb 9, 2017, 10:19 AM IST
टॅक्स चोरी प्रकरणात सानिया मिर्झाला नोटीस title=

नवी दिल्ली :  टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या अडचणी वाढू शकतात. सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटने टॅक्स चोरीच्या प्रकरणात सानियाला समन्स पाठवला आहे.

सर्व्हिस टॅक्स न भरल्यामुळे तिला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सर्व्हिस टॅक्स ऑफिसमधून 6 फेब्रुवारी रोजी सानियाला ही नोटीस पाठवण्यात आली. 16 फेब्रुवारीपर्यंत सानिया किंवा तिच्याकडून एखाद्या व्यक्तीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नोटीसमध्ये अर्थ कायदा, 1994 च्या नियमानुसार सर्व्हिस टॅक्स न भरल्यामुळे त्यासंबंधित चौकशी करण्यात येणार आहे.