बांग्लादेशी क्रिकेटर शहादत हुसैनला पत्नीसह अटक होणार?

बांग्लादेशच्या एका क्रिकेटवर आणि त्याच्या पत्नीवर आपल्या घरात काम करणाऱ्या नोकर मुलीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात या दाम्पत्याला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. 

Updated: Sep 8, 2015, 12:26 PM IST
बांग्लादेशी क्रिकेटर शहादत हुसैनला पत्नीसह अटक होणार? title=

ढाका : बांग्लादेशच्या एका क्रिकेटवर आणि त्याच्या पत्नीवर आपल्या घरात काम करणाऱ्या नोकर मुलीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात या दाम्पत्याला अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. 
 
या बांग्लादेशी क्रिकेटरचं नाव आहे शहादत हुसेन... धक्कादायक म्हणजे, त्याच्या घरात काम करणारी अल्पवयीन मुलगी ही केवळ 11 वर्षांची आहे. 

व्हिडिओ : सराव करताना भिडले दोन ऑस्ट्रेलियन प्लेअर, एकाचा शर्ट फाटला

रविवारी रात्री रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत ही अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या नजरेस पडली होती. त्यानंतर, पोलिसांनी वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहादतच्या घरावर रात्री उशीरा छापा टाकला होता. त्यावेळी शहादत आणि त्याची पत्नी न्रितो घरी नव्हते.

मुलीच्या डोळ्यावर आणि शरीराच्या अनेक भागावर गंभीर जखमा आहेत. आम्ही पाहिलं तेव्हा ती खूप रडत होती. आपण शहादतच्या घरी काम करत असल्याचं आणि तिथंच या क्रिकेटरननं आणि त्याच्या पत्नीनं आपल्याला मारहाण केल्याचं या मुलीनं माहिती दिली, अशी माहिती पोलीस अधिकारी अन्वर हुसैन यांनी दिलीय. 

पोलिसांनी जखमी मुलीला ढाक्याच्या एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी हलवलंय. तर शहादत आणि त्याच्या पत्नीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलीय. हे दाम्पत्य सध्या तरी घरी सापडलेलं नाही मात्र त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 

शहादतननं बांग्लादेशसाठी आत्तापर्यंत 38 टेस्ट आणि 51 वनडे मॅच खेळल्यात. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.