नवी दिल्ली: टीम इंडियाचा बॅट्समन सुरैश रैनानं वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीबद्दल आज जो खुलासा केलाय, तो आपल्याला कदाचितच माहिती असेल. आजपर्यंत आपण धोनीला खूप धीर-गंभीर स्वभावाचा व्यक्ती म्हणून ओळखत होतो. पण तसं अजिबात नाहीय, धोनीचा सहकारी सुरेश रैनानं धोनी म्हणजे टीम इंडियाचा कॉमेडियन असल्याचं म्हटलंय. धोनी टीमच्या सर्व सदस्यांना खूप हसवतो, असं रैनानं सांगितलं.
आणखी वाचा - VIDEO : सुरेश रैना म्हणतोय, तू मिली सब मिला...
रैनानं एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं, मला इतरांबद्दल माहित नाही पण माझ्यासाठी धोनी टीमचा विनोदवीर आहे. तो मैदानात गंभीर राहतो पण जसा ड्रेसिंग रूममध्ये येतो सगळ्या त्याच्या बोलण्यानं हसवतो. स्टार बॅट्समन रैनानं धोनीचं कौतुक केलंय.
रैना म्हणतो, टीमच्या आनंदात स्वत: आनंद साजरा करण्याची कला धोनीकडून शिकलो. जेव्हा धोनीच्या घरी नवा पाहुणा येणार होता, तेव्हा मी विचारलं की तू घरी का जात नाहीस. तेव्हा त्यानं म्हटलं की त्याच्यासाठी पहिले देश आहे.
आणखी वाचा - बऱ्याच कालावधीनंतर एकत्र खेळणार धोनी-सेहवाग
रैना पुढे म्हणतो, जर आपण दबावाखाली असाल तर त्याच्यासोबत बोलावं तो अगदी सोप्या शब्दात आपल्याला समजावेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.