इस्लामाबाद : बुमबुम आफ्रिदी लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे, पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी २०१५ च्या वर्ल्डकपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं आफ्रिदीनं जाहीर केलंय.
आफ्रिदी सध्या पाकिस्तानच्या ट्वेण्टी२० संघाचा कर्णधार असून २०१६ साली भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानला जेतेपद मिळवून देण्याचं आपलं स्वप्न असल्याचं आफ्रिदीनं म्हटलं आहे. यापुढे ट्वेण्टी२० वरच लक्ष केंद्रित करण्याचं आफ्रिदीनं ठरवलं आहे.
वन डेत आफ्रिदीच्या खात्यात ७ हजार ८७० धावा आणि ३९१ विकेट्स जमा आहेत. विश्वचषकापर्यंत वन डेत 400 विकेट्स आणि आठ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याची संधी आफ्रिदीकडे आहे.
३४ वर्षीय आफ्रिदीनं आजवर ३८९ वन डे आणि २७ कसोटी सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.