धर्मशाला : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेली टेस्ट शाब्दिक वादांमुळे चांगलीच चर्चेत आहे. या वादामध्येच आता ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथनं भर टाकली आहे. स्मिथनं भारतीय टीमबाबत पॅव्हेलियनमधून आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शेवटच्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या हेजलवूडचा कॅच मुरली विजयनं पकडला आणि भारतीय टीमनं जल्लोष करायला सुरुवात केली. या कॅचबद्दल अंपायरना डाऊट आल्यामुळे त्यांनी थर्ड अंपायरकडे धाव घेतली.
मुरली विजयनं पकडलेला हा कॅच जमिनीला टेकलेला असल्याचं दिसल्यामुळे थर्ड अंपायरनं हेजलवूडला नॉट आऊट दिलं. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या स्मिथनं चुकीचं अपील केल्याबद्दल भारतीय टीमबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली.
In response to @BenHorne8 tweet. This is the video. pic.twitter.com/TiiClKS1BH
— Neroli Meadows (@Neroli_M_FOX) March 27, 2017