कोलकाता: दादाच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. बंगाल टायगर आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आता बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालाय. बीसीसीआय अध्यक्ष दालमियांच्या निधनानंतर दादावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय.
आणखी वाचा - जगमोहन दालमिया यांचे निधन
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज ही घोषणा केली. दालमिया यांच्या निधनानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनला एका सक्षम नेतृत्वाची गरज होती. त्यामुळं सौरव गांगुलीची निवड करण्यात आल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली आणि दालमिया यांचा मुलगा अविषेक यांच्यात स्पर्धा होती. पण सौरवला ममता बॅनर्जींचा पूर्ण पाठिंबा होता. आज दोघांनीही ममता बॅनर्जींची भेट घेतली होती. पण अखेर सौरवची अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.
आणखी वाचा - बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी केले नेत्रदान
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.