मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या 4 खेळाडूंचं निलंबन

मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या चार क्रिकेटपटूंचं निलंबन करण्यात आलं आहे.

Updated: Aug 8, 2016, 04:01 PM IST
मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या 4 खेळाडूंचं निलंबन  title=

केप टाऊन : मॅच फिक्सिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या चार क्रिकेटपटूंचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये टेस्ट क्रिकेटमधला माजी विकेटकीपर थमी त्सोलेकाईलचाही समावेश आहे. मॅच फिक्सिंग करणाऱ्या या क्रिकेटपटूंचं सात ते 12 वर्षांपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकानं ही घोषणा केली आहे. 

जिन सिम्स, पुमेलेला मॅटशिवके, एथी एमभलाटी आणि थमी त्सोलेकाईल हे चार खेळाडू फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळले. यापैकी त्सोलेकाईलचं 12 वर्ष निलंबन करण्यात आलं आहे, तर , सिम्सचं 7 वर्षांसाठी, पुमेलेला आणि एथीचं 10 वर्षांसाठी निलंबन झालं आहे. 

2015मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या डोमॅस्टिक टी20 चॅम्पियनशीपमध्ये या खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केलं होतं. पुमेलेला मॅटशिवके, एथी एमभलाटी आणि जिन सिम्सनं दक्षिण आफ्रिकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गुलाम बोदीकडून मॅच फिक्सिंगची रक्कम घेतली होती.  गुलाम बोदीचं याआधीच 20 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं.