close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गौतम गंभीर आणि धोनीबाबत चर्चांना उधाण

शनिवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पुण्याविरुद्धच्या मॅचनंतर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनीबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

Updated: May 15, 2016, 07:32 PM IST
गौतम गंभीर आणि धोनीबाबत चर्चांना उधाण

कोलकता: शनिवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पुण्याविरुद्धच्या मॅचनंतर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनीबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. या मॅचमध्ये पुण्याची टीम 74 रनवर 4 विकेट अशा बिकट परिस्थितीमध्ये होती, तेव्हा धोनी बॅटिंगला आला. 

यावेळी कोलकत्याचा कॅप्टन गंभीरनं धोनीसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये लावतात तशी फिल्डिंग लावली. धोनीच्या जवळच त्यानं फिल्डरना उभं केलं, तर गंभीर स्वत: सिली पॉईंटला उभा राहिला. 

गंभीरच्या या रणनितीमुळे धोनीला रन काढणं मुश्किल होऊन बसलं. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा धोनी 22 बॉलमध्ये फक्त 8 रनवर खेळत होता. 20 पेक्षा अधिक बॉल खेळल्यानंतरच्या या आठ रन आत्तापर्यंतचा सगळ्यात कमी स्कोअर आहे.