आयपीएलमध्ये सुरेश रैनाचं होणार अनोखं रेकॉर्ड

आयपीएलच्या पहिल्या वर्षापासून म्हणजेच 2008 पासून सुरेश रैना एकही मॅचला मुकलेला नाही.

Updated: May 9, 2016, 10:36 PM IST
आयपीएलमध्ये सुरेश रैनाचं होणार अनोखं रेकॉर्ड title=

मुंबई: आयपीएलच्या पहिल्या वर्षापासून म्हणजेच 2008 पासून सुरेश रैना एकही मॅचला मुकलेला नाही. आयपीएलमध्ये सुरेश रैनाच्याच नावावर सर्वाधिक रन्स आहेत. रैनानं आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 143 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 33.48च्या सरासरीनं तब्बल 3985 रन केल्या आहेत. 

आयपीएलच्या पहिल्या नऊ पैकी आठ मोसमामध्ये रैना चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळला. पण चेन्नईवर बंदी आल्यामुळे तो यंदा गुजरात लायन्सकडून खेळत आहे. गुजरातच्या टीमचा तो कॅप्टनही आहे. 

आयपीएलची एकही मॅच न मुकलेल्या रैनाचा हा रेकॉर्ड मात्र आता तुटणार आहे. रैनाला कुठली दुखापत झालेली नाही किंवा त्याच्यावर कारवाईही झालेली नाही. रैनाच्या घरी गोड बातमी येणार असल्यानं रैनानं आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. 

बायकोच्या डिलिव्हरीसाठी रैना हॉलंडला रवाना झाला आहे. मागच्या वर्षी 3 एप्रिलला सुरेश रैना आणि प्रियांका चौधरी लग्नाच्या बेडीत अडकले होते.