टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला

टीम इंडियाच्या कोचपदी नुकताच नियुक्त झालेला अनिल कुंबळे आता कामाला लागलाय. कोचपदी नियुक्त झाल्यानंतर कुंबळेनं प्रथमच टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडियाचं सध्या बंगळुरुमध्ये शिबिर सुरु आहे. यावेळी कुंबळेनं टीम इंडियाच्या बॉलर्सनं लिडर्ससारखा विचार करायला पाहिजे असं सांगत टीम इंडियाच्या कमकुवत बॉलिंग डिपार्टमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं.

Updated: Jun 29, 2016, 10:38 PM IST
टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला title=

मुंबई : टीम इंडियाच्या कोचपदी नुकताच नियुक्त झालेला अनिल कुंबळे आता कामाला लागलाय. कोचपदी नियुक्त झाल्यानंतर कुंबळेनं प्रथमच टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडियाचं सध्या बंगळुरुमध्ये शिबिर सुरु आहे. यावेळी कुंबळेनं टीम इंडियाच्या बॉलर्सनं लिडर्ससारखा विचार करायला पाहिजे असं सांगत टीम इंडियाच्या कमकुवत बॉलिंग डिपार्टमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं.

सराब शिबिरात प्रामुख्यानं आऊटडोअरवर भर देणार आहे. धोनी आणि कोहली या दोन्ही कर्णधारांशी आपली बातचीत झाली असून टीमचा पुढील मार्ग काय असेल यावर आपण चर्चा केली असल्याचं कुंबळेनं सांगितलं.