टीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वलस्थानी

वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेणारी टीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थानी पोहोचलीये.

Updated: Aug 17, 2016, 03:49 PM IST
टीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वलस्थानी title=

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेणारी टीम इंडिया टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थानी पोहोचलीये.

टीम इंडिया ११२ गुणांसह पहिल्या स्थानी आहे तर १११ गुणांसह पाकिस्तान या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका दौऱ्यात तीनही सामने गमावल्याने ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी फेकली गेलीये.

श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला. यामुळे ऑस्ट्रेलियाचे रँकिंग घसरले. याचा फायदा टीम इंडियाला झाला. 

वेस्ट इंडिजविरुद्धची अखेरची मालिका जिंकल्यास भारत पहिले स्थान अधिक मजबूत करु शकेल.