शाहरूख खान अबरामला फॅन्सच्या गर्दीपासून कसा वाचवतो - पाहा व्हिडिओ

पण सध्या शाहरूखचा सर्वात फेवरेट आहे तो अबराम... 

Updated: Feb 3, 2016, 09:02 PM IST
शाहरूख खान अबरामला फॅन्सच्या गर्दीपासून कसा वाचवतो - पाहा व्हिडिओ title=

मुंबई :  सुपरस्टार शाहरूख खान याला त्याचा सर्व फावला वेळ आपल्या मुलांसोबत घालवायला आवडतो. त्याचा मोठा मुलगा आता खूप मोठा झाला असल्याने त्याला आपल्या मित्रांसोबत भटकायला आवडतं . सुहाना ही आपल्या वडिलांची आवडती आहे पण सध्या शाहरूखचा सर्वात फेवरेट आहे तो अबराम... 

(खाली शाहरूखचा व्हिडिओ आहे)

शाहरूखला आपल्या मोठ्या दोन मुलांसोबत वेळ घालवता येत नसला तरी तो आपल्या सर्वात लहान मुलासोबत सर्वाधिक काळ घालविण्याचा प्रयत्न करतो. त्यातून तो त्याला आपल्यासोबत शुटिंगला घेऊन जातो. आम्ही तुम्हांला आज जो व्हिडिओ दाखविणार आहेत. त्यात शाहरूख खान आपला आगामी चित्रपट रईसच्या शुटिंगसाठी गुजरातमध्ये गेला होता. त्यावेळी तो अबरामला सोबत घेऊन गेला होता. 

(खाली शाहरूखचा व्हिडिओ आहे)

पण आपल्या मुलाला गर्दीतून वाचविण्यासाठी तो नेहमी एक युक्ती करतो. विमानतळातून बाहेर  पडताना तो सर्वात प्रथम अबरामला सुखरूप गाडीत बसवून घेतो. त्यानंतर तो आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत नंतर गाडीकडे येतो.  शाहरूख गाडीजवळ आल्यावर गुजरात विमानतळावर फॅन्सने एकच कल्ला केला होता. 

पाहा हा व्हिडिओ...

 

आयपीएलच्या एका सामन्यावेळी उला ला उला ला गाण्यावर नाचताा अबराम