ट्विटरवर अश्विनची बांगलदेशच्या फॅनशी जुंपली

आता क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक बाचाबाची आता ट्विटरवर येऊन पोहोचलीये. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आर. अश्विन याची ट्विटरवर एका बांगलादेशी फॅनशी चांगलीच जुंपली. अश्विननेही या फॅनला सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले. 

Updated: Mar 14, 2016, 12:44 PM IST
ट्विटरवर अश्विनची बांगलदेशच्या फॅनशी जुंपली title=

नवी दिल्ली : आता क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक बाचाबाची आता ट्विटरवर येऊन पोहोचलीये. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आर. अश्विन याची ट्विटरवर एका बांगलादेशी फॅनशी चांगलीच जुंपली. अश्विननेही या फॅनला सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले. 

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि बांगलादेशच्य सामने चांगलेच रंगतदार होतायत. याची सुरुवात गेल्या वर्षीच्या वर्ल्डकपमधील क्वार्टरफायनलमधील सामन्यापासून झाली. विराट कोहली आणि रुबेल होसेन यांच्यात वर्ल्डकपदरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर वनडे सीरिजमध्ये बांगलादेशने भारताला हरवले आणि बांगलादेशी फॅन्सची भारतायी हुर्यो उडवली.

नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये धोनीच्या व्हायरल फोटोची खूप चर्चा झाली. मात्र जेव्हा आशिया कपच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला हरवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी बांगलादेशच्या फॅन्सना चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. या वर्ल्डकपमध्ये २३ मार्चला भारताचा सामना बांगलादेशशी बंगळूरु येथे होणार आहे.