आयपीएलमध्ये अंपायर्सची मैदानावर मोठी चूक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारतीय अंपायर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीके नंदन आणि नितीन मेनन यांची एक चूक समोर आली आहे. सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरला मुंबई इंडियन्सच्या विरोधात सहाव्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर फोर मारल्यानंतर पुन्हा पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेऊ दिली.

Updated: Apr 13, 2017, 03:37 PM IST
आयपीएलमध्ये अंपायर्सची मैदानावर मोठी चूक title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारतीय अंपायर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीके नंदन आणि नितीन मेनन यांची एक चूक समोर आली आहे. सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरला मुंबई इंडियन्सच्या विरोधात सहाव्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर फोर मारल्यानंतर पुन्हा पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेऊ दिली.

वॉर्नरने जसप्रीत बुमराहच्या सहाव्या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर फोर मारला पण मिशेल मॅकलेनाघनच्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये पुन्हा स्ट्राइकवर आला. नंदन आणि मेनन यांना दोघांनाही ही गोष्ट लक्षात आली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीवी अंपायर वाय.सी बद्री यांच्या देखील ही गोष्ट लक्षात आली नाही.

याआधीच्या सामन्यांध्ये याच दोन्ही अंपायर्सनी मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने आऊट दिलं होतं.