मुंबई : सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याने अंपायरींग करणाऱ्या अंपायरच्या चिंता वाढवल्या आहेत. अंपायरांचं म्हणणं आहे की, मुस्तफिजूरच्या बॉलला योग्य प्रकारे जज करणं खूप कठिण होऊन जातं.
मुस्तफिजूरने काही महिन्यांमध्येच मोठं यश आणि नाव कमावलं आहे. मुस्तफिजूर हा मुरलीधरन, कुंबले आणि शेन वॉर्न सारखे बॉल टाकण्याची ताकद आहे. सध्या स्विंग मास्टर म्हणून त्याची चर्चा आहे.
मुस्तफिजूरचा बॉल थांबून जेव्हा बाऊंस होतो तेव्हा बॅट्समन्सना घाम सुटतो. त्यासाठी तो कोणतीही वेगळी अॅक्शन वापरत नाही. त्याच्या या बॉलिंग अॅक्शनमुळे अनेक बॅट्समन्सना त्याचा सामना करतांना सांभाळून खेळावं लागतंय.