क्रिकेट मैदानात बोल्टकडून युवराज सिंहला झटका

सुपरस्टार एथलीट उसेन बोल्ट रनिंग ट्रॅकचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो, मात्र हुसेनने क्रिकेटही उत्तम रित्या खेळतो. भारत दौऱ्यावर आलेल्या या एथलीटने युवराज सिंह कर्णधार असलेल्या टीमला शेवटच्या चेंडूत हरवलं आणि विजय निश्चित केला. जिंकल्यानंतर उसेन बोल्टने आपली ट्रेडमार्क स्टाईलही दाखवली.

Updated: Sep 3, 2014, 05:19 PM IST
क्रिकेट मैदानात बोल्टकडून युवराज सिंहला झटका title=

बंगळुरू : सुपरस्टार एथलीट उसेन बोल्ट रनिंग ट्रॅकचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो, मात्र हुसेनने क्रिकेटही उत्तम रित्या खेळतो. भारत दौऱ्यावर आलेल्या या एथलीटने युवराज सिंह कर्णधार असलेल्या टीमला शेवटच्या चेंडूत हरवलं आणि विजय निश्चित केला. जिंकल्यानंतर उसेन बोल्टने आपली ट्रेडमार्क स्टाईलही दाखवली.

बोल्टने चिन्नास्वामी स्टेडीयममधील 6 हजार प्रेक्षकांसमोर दाखवलं की तो शानदार क्रिकेट खेळू शकतो. स्टेडीयममधील त्याचे फॅन्स जगातील सर्वात वेगवान गोलंदाजाची झलक मिळवण्यासाठी तहानलेले होते. बोल्टच्या टीमने सात खेळाडूच्या युवराज सिंहच्या टीमला हरवलं. बोल्टने शेवटच्या चेंडूत युवीच्या टीमवर विजय मिळवला, हा सामना चार-चार ओव्हर्सचा होता.

सहा ओलिम्पिक मेडल जिंकणारे एथलीट बोल्टने 19 चेंडूत 45 रन्स केल्या, यात पाच षटकारही होते, यातील तीन षटकार तर त्याने युवराज सिंहच्या बोलिंगवर लावले होते. युवीने दिलेलं 59 धावांचं लक्ष बोल्टने शेवटच्या चेंडूत गाठलं, बोल्टच्या प्रत्येक फटकारांचा प्रेक्षक आनंद घेत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.