video : पहिल्या दिवशी बांगलादेशने केली अशी चूक

हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांपर्यंत मजल मारली. 

Updated: Feb 10, 2017, 12:38 PM IST
video : पहिल्या दिवशी बांगलादेशने केली अशी चूक title=

हैदराबाद : हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांपर्यंत मजल मारली. 

भारताचा सलामीचा फलंदाज मुरली विजयने पहिल्या दिवशी कसोटी क्रिकेटमधील ९वे शतक झळकावले. तो १०८ धावा करुन बाद झाला. शतक लगावण्याआधी विजयला एक जीवनदान मिळाले होते. 

१९व्या षटकांत मुरली विजय धावबाद होता होता वाचला. त्यावेळी त्याच्या खात्यात केवळ ३६ धावा होत्या. यावेळी जर मुरली विजय बाद झाला असता तर भारताला पहिल्या दिवशी इतकी मोठी धावसंख्या उभारणे कठीण झाले असते. 

बांगलादेशच्या क्रिकेटपटूंची एक चूक मुरली विजयसाठी संधी देणारी ठरली. त्याने या संधीचे सोने केले आणि १०८ धावा तडकावल्या.