मुंबई-दिल्ली सामन्यादरम्यान बॉल बॉयचा जबरदस्त कॅच

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका कॅचची चांगलीच चर्चा होतेय.

Updated: Apr 22, 2017, 09:42 PM IST
मुंबई-दिल्ली सामन्यादरम्यान बॉल बॉयचा जबरदस्त कॅच title=

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका कॅचची चांगलीच चर्चा होतेय.

हा कॅच कोणत्याही मैदानातील कोणत्याही क्रिकेटपटूने घेतलेला नाहीये तर बॉल बॉयने हा जबरदस्त कॅच घेतलाय. पार्थिव पटेलने ३.२ षटकांत कॅगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर जबरदस्त फटका मारला. 

हा चेंडू बाऊंड्री लाईनच्या पलीकडे असलेल्या बॉल बॉयच्या हातात विसावला. त्याने धावत जाऊन हा कॅच पकडला. त्याच्या या कॅचचे कमेंटेटरनीही कौतुक केले.